बार्बाडोस येथे झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने विजेतेपद पटकावले. त्यावेळी एकच जल्लोष करण्यात आला. त्यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते म्हणजे टीम इंडिया भारतात कधी येणार? वादळी वारे आणि पावसामुळे टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली होती.
बार्बाडोसमधून काल टीम इंडियासाठी विशेष विमान पाठवण्यात आले होते. गुरुवारी आज सकाळी 7 वाजता टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल झाली आणि एकच जल्लोष झाला. चाहत्यांकडून टीम इंडियाचे दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली.
आज सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवरही टीम इंडिया जाणार आहे. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढली जाणार असून 3 वाजता टीम इंडिया मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.