10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज (30 नोव्हेंबर) संध्याकाळी उशिरा घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघांमध्ये तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या खेळाडूंची कॅप्टन पदासाठी निवड केली आहे. रोहित शर्मा याला वन डे मालिकेमधून आराम देण्यात आला आहे. वन डे मध्ये के. एल. राहुल तर टी-20 साठी सूर्यकुमार यादव आणि कसोटीसाठी रोहित शर्माच कॅप्टन असणार आहे. दरम्यान, टीम इंडियाची निवड करताना भविष्याचा विचार आणि सूचक इशारा तसेच शेवटची संधी असा मिलाप झाल्याचे दिसून येते.
वन डे क्रिकेटमधून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्यामध्ये के. एल. राहुल याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा कॅप्टन असणार असून संघाच्या उपकर्णधारपदी जसप्रीत बुमराह याची निवड करण्यात आली आहे. टी-२० मध्ये सूर्यकुमार यादव याच्याकडेच संघाची कर्णधारपदी निवड करण्यात आली तर रविंद्र जडेजाकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेले संघ पाहा:
2 कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (C), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (WK), के एल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (VC), प्रसिद्ध कृष्ण.
3 वनडेसाठी भारताचा संघ: रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C&W), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
3 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सन , रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
मोहम्मद शमीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची उपलब्धता फिटनेसवर अवलंबून आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. यानंतर 17 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होईल. 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर, दुसरी कसोटी नवीन वर्षात म्हणजे 2024 मध्ये 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळली जाईल.