India vs England 
क्रीडा

T20 World Cup 2024, IND vs ENG Semifinal: गयानाच्या खेळपट्टीवर 'रन'धुमाळी; संभावित प्लेईंग ११, पिच रिपोर्टबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

गयानामध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० वर्ल्डकपचा सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे.

Published by : Naresh Shende

T20 World Cup 2024, IND vs ENG Semifinal : गयानामध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० वर्ल्डकपचा सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघाने उल्लेखनीय कामगिरी केलीय. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघर्ष करून इंग्लंडने कमबॅक केलं आहे. ग्रुप स्टेजच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला होता. सुपर ८ मध्येही इंग्लंडला दक्षिण आफ्रिकाने हरवलं होतं. तरीही इंग्लंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. संघाने त्यांचा नेट रनरेट खूप चांगला केला आहे. २०२२ च्या टी-२० वर्ल्डकपच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सेमीफायनल सामन्यात भारताला इंग्लंडचा पराभव करुन बदला घेण्याची संधी आहे.

भारत- इंग्लंड आमनेसामने

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-२० च्या २३ सामन्यांमध्ये भारताने १२ तर इग्लंडने ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. शेवटच्या ६ टी-२० सामन्यांमध्ये भारताने ४ सामने तर इंग्लंडने २ सामन्यांत विजय संपादन केलं आहे.

भारताची संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव

इंग्लंडची संभाव्य प्लेईंग ११

फिल सॉल्ट, जॉस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रुक, मोईन अली, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, रिस टॉपले, आदिल राशिद

पिच रिपोर्ट

गयानात हा सामना खेळवला जाणार आहे. काही दिवसांपासून या परिसरात पाऊस पडत आहे. त्यामुळे खेळपट्टीवर दव असण्याची शक्यता आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. वेगवान गोलंदाजांशिवाय या खेळपट्टीवर फिरकीपटूही चांगली कामगिरी करु शकतात. प्रोविडेंसचं खेळपट्टी धीम्या गतीची मानली जाते. याठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये सरासरी १२७ धावा झाल्या आहेत. तर दुसऱ्या इनिंगच्या सरासरी धावा ९५ आहेत. या मैदानावर एकूण ३४ आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये १६ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. तर क्षेत्ररक्षणानंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी १४ वेळा विजय मिळवला आहे.

गयानात कसं असेल हवामान?

गयानाच्या प्रोविडेंस स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. गयानामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. आजच्या सामन्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या रिपोर्टनुसार, या सामन्यात पाऊस पडण्याची ७० टक्के शक्यता आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. पण आयसीसीने २५० मिनिटांचा म्हणजेच ४ तासांचा अतिरिक्त वेळ दिलेला आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश