टीम इंडियाने 13 षटकात 4 विकेट गमावत 83 धावा केल्या आहेत. विजयासाठी 42 चेंडूत 77 धावांची गरज होती. हार्दिक पांड्या 29 आणि विराट कोहली 28 धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये 41 चेंडूत 52 धावांची भागीदारी झाली.
अक्षर पटेल धावबाद झाला. त्याने 2 धावा केल्या. टीम इंडिया अडचणीत सापडली आहे.
सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. तो 15 धावांवर हरिस रौफने बाद झाला. टीम इंडियाने 5.3 षटकात 3 विकेट गमावत 26 धावा केल्या आहेत.
हरिस रौफने रोहित शर्माला 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टीम इंडियाची धावसंख्या 3.2 षटकात 2 गडी बाद 10 धावा.
नसीम शाहने केएल राहुलची पुन्हा एकदा बाद केले आहे. भारताच्या सलामीवीराने हातांनी खेळण्याचा प्रयत्न केल्याने आणि चेंडू स्टंपकडे वळल्याने त्याला वेगवान पराभव पत्करावा लागला.
मेलबर्नमध्ये भारताला 160 धावांचे लक्ष्य मिळाले.
भुवनेश्वर कुमारने शाहीन आफ्रिदीला १६ धावांवर बाद केले. तर, शान मसूद एका बाजूने पाकिस्तानसाठी किल्ला लढवत असून अर्धशतक पूर्ण केले आहे.
पाकिस्तानला आणखी एक धक्का मिळाला आहे. आसिफ अली मोठा फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला आहे. अर्शदीप सिंगने आसिफ अलीची विकेट घेतली. तर, दिनेश कर्तिकने झेल घेतला.
पाकिस्तानी संघाची विकेट्स पडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आता मोहम्मद नवाजही बाद झाला आहे. नवाजला हार्दिक पांड्याने दिनेश कार्तिकच्या हाती झेलबाद केले. नवाजने 9 धावा केल्या. पाकिस्तानची धावसंख्या सध्या सहा बाद 117 धावा आहे.
पाकिस्तानला पाचवा धक्का बसला आहे. हैदर अली दोन धावा करून बाद झाला. हैदरला हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादवच्या हाती झेलबाद केले. 14.3 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 101 धावा आहे. शान मसूद 31 आणि मोहम्मद नवाज एका धावेवर आहेत.
हार्दिक पांड्याने दमदार गोलंदाजी करत शादाब खानला बाद केले आहे. त्याला केवळ पाच धावा करता आल्या आहेत.
केवळ ३२ चेंडूत ५१ धावा करत अर्धशतक पूर्ण करत भारतासाठी धोक्याची घंटा ठरलेल्या इफ्तिखार अहमदला मोहम्मद शमीने बाद केले आहे.
शान मसूद आणि इफ्तिखार अहमद यांनी पाकिस्तान संघाला सावरले आहे. त्यांच्या अर्धशतकी भागीदारी झाली. ४२ चेंडूत ५५ धावांची भागीदारी करत आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहेत. तर, इफ्तिखार अहमदने अक्षरच्या एकाच षटकात तीन षटकार मारले. व ३२ चेंडूत ५१ धावा करत अर्धशतक पूर्ण केले.
अर्शदीप सिंहने पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला आहे. बाबर आझम पाठोपाठ मोहम्मद रिजवानही ४ धावांवर बाद झाला आहे.
भुवनेश्वर कुमारने भारतीय संघासाठी गोलंदाजीची सुरुवात केली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम क्रीझवर आले. रिझवानची सुरुवात चांगली झाली नाही आणि तिसऱ्या चेंडूवर तो जखमी झाला. त्यामुळे काही मिनिटे खेळ थांबला होता. तर, पहिल्या ओव्हरमध्येच अर्शदीपने पाकिस्तानला बाबरच्या रुपात पहिला धक्का दिला आहे. यामुळे भोपळा न फोडताच आझम बाबरला तंबूत परतावे लागले आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही प्रथम मैदानात उतरणार आहोत. आमच्याकडे सात फलंदाज, तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू आहेत, असो रोहित शर्माने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषकाला जोरदार कालपासून सुरुवात झाली आहे. आज ऑस्ट्रेलियामध्ये हायहोल्टेज सामना पार पडणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या टी-20 विश्वचषकातील पहिला सामना खेळत आहेत. पाकिस्तानचे भेदक गोलंदाज आणि भारताची विस्फोटक फलंदाजी, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरले आहेत. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. तर भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.