आज ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषकातील हायहोल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला. डगमगत्या संघाला सावरत विराट कोहलीने जोरदार फलंदाजी करत भारताला विजय प्राप्त करून दिला आहे. भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. पाकिस्तान संघाने फलंदाजी करत भारतासमोर १६० धावांचे आव्हान ठेवले होते. नंतर भारतीय संघ धावा करण्यासाठी आलेला असताना भारताचा पराभव होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यांने डाव सावरत संघाला विजय प्राप्त करून दिला आणि पाकिस्तानचा दारुण पराभव केला.
टीम इंडियाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली होती. 31 धावात टीम इंडियाने चार विकेट गमावले होते. केएल राहुल (4), रोहित शर्मा (4) ही सलामीवीरांची जोडी 10 धावात तंबुत परतली. त्यानंतर सूर्यकुमार यादव (15) आणि अक्षर पटेल (2) धावात तंबुत परतले. त्यावेळी भारताचा पराभव दिसत होता. खराब चेंडूंवर चौकार-षटकार लगावले.
हार्दिकने 37 चेंडूत 40 धावा केल्या. यात 1 चौकार आणि 2 षटकार होते. त्याने विराट सोबत 113 धावांची शतकी भागीदारी केली. या पार्टनरशिपमुळे टीम इंडिया मॅचमध्ये आली. विराटने डेथ ओव्हर्समध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाने हा सामना जिंकला. दरम्यान गोलंदाजीत भारताकडून अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्या यशस्वी गोलंदाज ठरले. दोघांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वरने प्रत्येकी एक विकेट घेतला.