दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थ येथे झालेल्या पराभवानंतर, आज बुधवारी अॅडलेड ओव्हलवर बांग्लादेशविरुद्ध लढत असताना भारताला विजयी मार्गावर परतायचे आहे. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्हा संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. परंतु आता भारत आणि बांग्लादेश यांच्यामधील सामना पावसामुळे थांबला आहे. भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे बांग्लादेश DLS पद्धतीच्या आधारे 17 धावांनी पुढे आहे. बांग्लादेशचा सलामीवीर लिटन दासने भारताविरुद्ध 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक झळकावून बांग्लादेशला धडाकेबाज सुरुवात करून दिली. तत्पूर्वी, विराट कोहलीने 44 चेंडूत 64 धावा केल्यामुळे भारताने अॅडलेडमध्ये सुरू असलेल्या गट 2 च्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध 6 बाद 184 धावा केल्या.