नवी दिल्ली : आयसीसी टी-20 महिला विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, या सामन्यापूर्वीच टीम इंडियासाठी तणाव वाढला आहे. अष्टपैलू पूजा वस्त्राकर हिला प्रकृतीच्या कारणामुळे हा सामना खेळणार नाही.
भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. 30 पैकी संघाने फक्त 6 सामने जिंकले आहेत. टीमने 3 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाकडून एकही टी-20 सामना जिंकलेला नाही. 21 फेब्रुवारी 2022 रोजी भारताने ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव केला होता. तेव्हापासून दोन्ही संघांमध्ये 11 सामने झाले असून एकही सामना भारत जिंकू शकलेला नाही. त्यांना 9 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. एक सामना अनिर्णित राहिला तर एक सामना बरोबरीत राहिला. अशा स्थितीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यावेळीही दडपणाखाली दिसतो.
अशातच, या सामन्यापूर्वीच अष्टपैलू पूजा वस्त्राकर संघाच्या बाहेर पडली आहे. पूजाला श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे वगळण्यात आले आहे. वस्त्राकरने भारतासाठी गट टप्प्यातील सर्व सामन्यांमध्ये 44.5 च्या गोलंदाजीच्या सरासरीने दोन बळी घेतले होते.
सामन्यातील दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत : भारतीय संघ : शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, यस्तिका भाटिया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव आणि रेणुका ठाकूर सिंग.
ऑस्ट्रेलिया : अॅलिसा हिली (विकेटकीपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (सी), अॅशले गार्डनर, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेरेहॅम, जेस जोनासेन, मेगन शट आणि डार्की ब्राउन.