Surykumar Yadav  
क्रीडा

MI vs KKR Live | सुर्यकुमारचे अर्धशतक; मुंबईचे कोलकत्तासमोर 162 धावांचे आव्हान

Published by : left

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकत्तासमोर (Kolkata Knight Riders) 162 धावांचे आव्हान ठेवले आहे. सुर्यकुमार यादवची 52 धावांची तर तिलक वर्मा 38 धावा आणि पोलार्डच्या 5 बॉलमध्य़े 22 धावांच्या तुफान खेळीने मुंबई इंडियन्सला 161 इतकी धावसंख्या उभारण्यात आली. आता हि धावसंख्या कोलकत्ता (Kolkata Knight Riders) पुर्ण करते की मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कोलकत्ता (Kolkata Knight Riders) रोखण्यात यशस्वी ठरतात हे पहावे लागणार आहे.

केकेआरने (Kolkata Knight Riders) टॉस जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलयं. फलंदाजीला उतरलेल्या मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही.कर्णधार रोहीत शर्मा 3 धावावर बाद झाला आहे. रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सची पहिली विकेट गेली आहे. तीन धावांवर उमेश यादवने सॅम बिलिंग्सकरवी झेलबाद केलं. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविसने 19 चेंडूत 29 धावा केल्या. यात दोन चौकार आणि दोन षटकार होते. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बिलिंग्सने स्टम्पिंग केलं. तर इशानने 21 चेंडूत `14 धावा केल्या. यात एक चौकार आहे.सुर्यकुमार यादवची 52 धावांची तर तिलक वर्मा 38 धावा आणि पोलार्डच्या 5 बॉलमध्य़े 22 धावांच्या तुफान खेळी केली.

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पहिल्या दोन सामन्यात पराभव झाला आहे.त्यामुळे आज विजयाचं खातं उघडण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न करेल.

राज्यात आजपासून स्वच्छता सेवा पंधरवडा; गिरगाव चौपाटीवरून सुरू होणार मोहीम

अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस