SRH vs RR Qualifier 2 Rule : आयपीएल २०२४ चा दुसरा क्वालिफायर सामना चेन्नईत सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, त्या संघाचा फायनलमध्ये प्रवेश होणार आहे आणि पराभूत झालेला संघ टूर्नामेंटमधून बाहेर होणार आहे. पण एक नियम असा आहे, ज्यामुळे एसआरएचचा संघ सामना न खेळताच फायनलमध्ये पोहोचू शकतो आणि राजस्थान रॉयल्स टूर्नामेंटमधून बाहेर जाईल.
आयपीएल २०२४ मध्ये फायनलसाठी एक संघ निश्चित झाला आहे. तर दुसऱ्या संघाबाबत अजूनही निर्णय झाला नाही. आयपीएल फायनलसाठी दुसऱ्या संघाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. एसआरएच आणि आरआर यांच्यात होणाऱ्या सामन्यानंतर फायनलच्या दुसऱ्या संघाबाबत निर्णय दिला जाईल. एसआरएचला पहिल्या क्वालिफायर सामन्यात केकेआरने पराभूत केलं. परंतु, अजूनही त्यांच्याकडे फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. यासाठी एसआरएचला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करावा लागेल.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास SRH ला होणार फायदा
एक नियम असा आहे, ज्यामुळे हैदराबादचा संघ सामना न खेळताच आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचू शकतो. पावसामुळे सामना रद्द झाल्यास सनरायजर्सचा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. आयपीएलच्या फायनल सामन्यासाठी राखीव दिवस आहे. परंतु, प्ले ऑफसाठी कोणताही राखीव दिवस ठेवला नाही. म्हणजेच ज्या दिवशी सामना खेळवला जाईल, त्याचदिवशी तो सामना पूर्ण करावा लागेल. सामना पूर्ण झाला नाहीतर, त्याला रद्द घोषित केलं जाईल.
नियमांनुसार, पावसामुळे सामना डिले झाल्यास, तो सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त २ तास दिले जातील. याशिवाय पंच कमीत कमी ५ षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न करतील. जर ५ षटकांचा सामना झाला नाही, तर सुपर ओव्हर होईल. सतत पाऊस पडल्यानं सुपर ओव्हरही झाली नाही, तर सामना रद्द घोषित केला जाईल. अशा परिस्थितीत जो संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असेल, तो संघ पुढे जाईल. जर पावसामुळे दुसरा क्वालिफायर सामना रद्द झाला, तर एसआरएचचा संघ फायनलमध्ये पोहचेल. कारण एसआरएचचा संघ गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सच्या पुढे असेल.