Sunil Gavaskar 
क्रीडा

कोणता संघ 'IPL 2024'चं जेतेपद जिंकणार? दिग्गज सुनील गावसकरांनी केली भविष्यवाणी, म्हणाले...

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आयपीएल २०२४ बाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

Published by : Naresh Shende

Sunil Gavaskar Prediction On IPl 2024 Winner Team : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आयपीएल २०२४ बाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. यंदाच्या आयपीएलच्या क्वालिफायरमध्ये केकेआरने हैदराबादचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता पुढील दोन सामने झाल्यानंतर फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या दुसऱ्या संघाचं नाव समोर येणार आहे. एलिमिनेटर सामन्यात जिंकणारा संघ क्वालिफायर २ मध्ये हेदराबादविरोधात खेळेल. त्यानंतर हा सामना जिंकणारा संघ केकेआरविरोधात आयपीएलचा फायनलचा सामना खेळेल. तत्पूर्वी भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी आयपीएलच्या फायनलबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना गावसकर म्हणाले, यावेळी आरसीबीचा संघ फायनलमध्ये पोहचेल आणि आयपीएलचा किताबही जिंकतील. एसआरएच,केकेआर, आरआर आणि आरसीबी यांच्यातील कोणता संघ आयपीएलचा किताब जिंकेल? असा प्रश्न गावसकरांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना गावसकर म्हणाले, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यंदाच्या आयपीएलचं जेतेपद जिंकेल.

राजस्थानचा संघ चार सामने हरला आहे. त्यांनी त्यांचा शेवटचा सामनाही खेळला नाही. ते सरावातून बाहेर झाले आहेत. त्यांना कोलकातासारखी खास कामगिरी करावी लागेल. ११ दिवस न खेळताही त्यांनी सामना जिंकला. मला वाटतं की, एलिमिनेटर सामनाही एकतर्फी होईल. आरसीबी राजस्थानवर भारी पडेल, असं झालं नाही तर मला आश्चर्य वाटेल.

आरसीबीच्या संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सर्वात पहिले एलिमिनेटर सामन्यात राजस्थानचा पराभव करावा लागेल. त्यानंतर क्वालिफायर दोनमध्ये हैदराबादचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश करावा लागेल. म्हणजेच आरसीबीला आयपीएलचा किताब जिंकण्यासाठी आणखी तीन सामने जिंकावे लागतील.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी