क्रीडा

Asian Games 2023 : आशिया गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची तूफान कामगिरी, भारताच्या पारड्यात एवढे पदकं

आशियाई स्पर्धेतील सातव्या दिवशी भारताने विविध क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारतीय खेळांडूनी आतापर्यंत एकूण ३८ पदकांची कमाई करत पदकतालिकेत चौथ्या झेप घेतली आहे.

Published by : Team Lokshahi

आशियाई स्पर्धेतील सातव्या दिवशी भारताने विविध क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी केली. टेनिस आणि स्क्वॉशमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली तर अॅथलेटिक्समध्ये दोन पदके पटकावली. या स्पर्धेत भारतीय खेळांडूनी आतापर्यंत एकूण ३८ पदकांची कमाई करत पदकतालिकेत चौथ्या झेप घेतली आहे.

भारतासाठी शूटिंगमधून सर्वाधिक पदके आली आहेत. नेमबाजांनी दमदार कामगिरी केली आहे. शूटिंगच्या विविध इव्हेंट्समधून भारताला आतापर्यंत 19 पदके मिळाली आहेत. यामध्ये सहा गोल्ड, सहा रौप्य आणि आठ कांस्य पदकांचा समावेश आह. घोडेस्वारी, स्क्वॅश, महिला क्रिेट आणि टेनिस मिश्र.... या प्रकरात भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 38 पदकांचा समावेश आहे. यामध्ये दहा सुवर्ण, 14 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे.

19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताच्या पदकांमध्ये मोठी भर पडण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत वेगवेगळ्या खेळामध्ये सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करत पदक पक्के केले आहे. यंदा भारताच्या नावावर कमीतकमी 100 पदकांची नोंद होण्याची शक्यता आहे.

बॅडमिंटन: भारत विरुद्ध चीन - पुरुष टीम (फायनल)

तेजिंदरपाल सिंह तूर आणि साहिब सिंह - पुरुष गोळे फेक (फायनल)

जेसविन एल्ड्रिन आणि श्रीशंकर मुरली - लांब उडी (फायनल)

अविनाश साबळे -3000 मीटर स्टीपलचेज (फायनल)

सीमा पूनिया - महिला डिस्कस थ्रो (फायनल)

हरमिलन बैंस आणि दीक्षा - महिला 1,500 मीटर (फायनल)

जिन्सन जॉनसन आणि अजय सरोज - 1,500 मीटर रनिंग (फायनल)

ज्योति याराजी आणि नित्या रामराज -100 मीटर (फायनल)

बॉक्सिंग - निकहत जरीन विरुद्ध रकसत चुथामत - महिला 50 किलो (सेमीफायनल)

Latest Marathi News Updates live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजीनामा देणार-सूत्र

Eknath Shinde Resign | मोठी बातमी, एकनाथ शिंदे देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा | Lokshahi

Maharashtra New CM Oath Ceremony Date | सत्तास्थापन लांबणीवर? Mahayuti

Rohit Pawar On Ram Shinde | अजित पवारांची तक्रार करणं हा रडीचा डाव, रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला

Rajesh Tope Post | विझलो आज जरी मी.., निवडणुकीत पराभवानंतर राजेश टोपे यांची भावनिक पोस्ट | Lokshahi