भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एका फोटोमुळे ट्रोल होत आहे. या फोटोत तो विनामास्क वावरताना दिसत आहे. या ट्रोलींगवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रतिक्रिया देत, पंतचा बचाव केला आहे
इंग्लंड आणि जर्मनी यांच्यात वेम्बली येथे झालेला यूरो कप सामना पंतने स्टेडियममध्ये जाऊन पाहिला होता. यानंतर ८ जुलै रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पंतव्यतिरिक्त टीम इंडियाचे थ्रो-डाऊन तज्ज्ञ दयानंद गराणी यांनाही कोरोनाची लागण झाली. पंतने यूरो कप सामन्याबाबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यानंतर तो बराच ट्रोल झाला होता. त्याने या फोटोत मास्क घातलेला नव्हता.
यावर गांगुली यानी एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हणाला, "इंग्लंडमधील यूरो कप आणि विम्बल्डन या दोन्ही स्पर्धांमध्ये आम्ही पाहिले की चाहत्यांबाबतच्या नियमात बरेच बदल झाले. सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले. भारतीय संघही २० दिवस रजेवर होता. अशा परिस्थितीत, मास्क घालून राहणे शक्य नाही." असे म्हणत त्यांनी पंतचा बचाव केला.
अहवाल निगेटिव्ह
पंतचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी आणखी सात दिवस त्याला क्वारंटाइन राहावे लागेल. त्याचबरोबर दयानंद यांच्या संपर्कात आलेले गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण, वृद्धिमान साहा आणि सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन यांनाही दूर आयसोलेट करण्यात आले आहे. हे सर्वजण लंडनमध्ये क्वारंटाइन नियमांचे पालन करत आहेत.