भारताची फुलराणी पीव्ही सिंधूने (PV Sindhu) शनिवारी पार पडलेल्या सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने चीनची कट्टर प्रतिस्पर्धी हान यूचा रोमांचक सामन्यात पराभव केला. सिंधू आणि हानचा सामना जवळपास एक तास चालला.
पीव्ही सिंधूने चीनची कट्टर प्रतिस्पर्धी हान यूचा रोमांचक सामन्यात पराभव केला. सिंधू आणि हानचा सामना जवळपास एक तास चालला. सिंधूने सामना 17-21, 21-11, 21-19 असा जिंकला.जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या पी. व्ही. सिंधूला हानने पहिल्या गेममध्ये चांगलेच दमवले. हान सुरूवातीपासूनच पहिल्या गेममवर पकड मिळवली. मात्र झुंजार सिंधूने दुस या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. तिने दुसरा गेम 21-11 असा सहज जिंकत बरोबरी साधली.
तत्पूर्वी, उपांत्य पूर्व फेरीत सिंधूने सेईना कावाकामीचा 21-15, 21-7 असा पराभव झाला आहे. तसेच पीव्ही सिंधूने या वर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर 300 विजेतेपद पटकावणारी दुहेरी ऑलिम्पिकपटू आहेत.
सिंगापूर ओपनच्या विजेतेपदासाठी पीव्ही सिंधूचा सामना जपानच्या अया ओहोरी किंवा चीनच्या जी यी वांग या दोन बॅडमिंटनपटूपैकी एकाशी होईल. ओहोरीला आता विजेतेपदाच्या लढतीसाठी जी यी वांगला पराभूत करावं लागेल. जर ओहोरीला विजेतेपदाच्या लढतीमध्ये चीनच्या जी यी वांगला पराभूत केले तर ओहोरी आणि पी व्ही सिंधूची लढत होईल.