Shubhman Gill Indian Team Captain For Zimbabwe Tour : भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये सहभागी झाला आहे. टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. भारत झिम्बाब्वेविरोधात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या जागेवर शुबमन गिल टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे.
बीसीसीआयने केली टीम इंडियाची घोषणा
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे
टी-२० वर्ल्डकप २०२४ साठी भारतीय संघात शुबमन गिलची निवड झाली नाही. गिलला राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आलं होतं. टीम इंडियाचे न्यूयॉर्क लीगचे सामने संपल्यानंतर शुबमनला भारतात परत पाठवण्यात आलं. त्यानंतर शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यात वादविवाद सुरु झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. त्यानंतर गिलने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून या वादविवादावर पडदा टाकला.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टी-२० वर्ल्डकपनंतर जिम्बाब्वे टूरसाठी शुबमन गिलला टीम इंडियाचा कर्णधार करण्यात आला आहे. टीम इंडियाने गिलला कर्णधारपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, या खेळाडूंचा बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये समावेश केला आहे.