भारताने रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला आहे. 279 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने आपले दोन्ही सलामीवीर 48 धावात गमावले होते. शिखर धवन आणि शुभमन गिल लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यरने डाव सावरला. दोघांनी दमदार भागीदारी केली. टीमचा स्कोर 200 च्या पुढे नेला.
श्रेयसने एकदिवसीय कारकीर्दीमधील सर्वोच्च खेळी करताना १११ चेंडूंत नाबाद ११३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १५ चौकारांचा समावेश होता. अय्यरने नाबाद 113 धावांची खेळी केली. त्याने 111 चेंडूत 15 चौकार लगावले. किशनने 84 चेंडूत 93 धावा फटकावल्या. संजू सॅमसन 30 धावांवर नाबाद राहिला.
किशनने आपल्या ८४ चेंडूंच्या खेळीत ४ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. श्रेयसनेही कमालीचे सातत्य दाखवताना एकदिवसीय कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेची सुरुवातच चांगली झाली नाही. 40 धावात त्यांनी दोन्ही ओपनर गमावले होते. एडन मार्करामने 89 चेंडूत 79 धावा फटकावल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकार होता. श्रेयस अय्यरचे शानदार शतक आणि इशान किशनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला.