Shreyas Iyer 
क्रीडा

वाह अय्यर! आयपीएलनंतर आई-वडिलांचं मनंही जिंकलं, कुटुंबासाठी शेअर केली 'ही' भावनिक पोस्ट

कोलकाताने आयपीएलचा किताब जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंचे आनंदाश्रू तरळले आणि ट्रॉफी आपल्या कुटुंबियांना समर्पित केली. खेळाडूंनी सोशल मीडियावर भाविनक पोस्ट लिहून कुटुंबियांचं मन जिंकलं.

Published by : Naresh Shende

Shreyas Iyer Emotional Post For Family : इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्सने इतिहास रचला. केकेआरने आयपीएलची तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकून इतिहासात नाव कोरलं. श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत कोलकाताने फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादचा दारुण पराभव केला. कोलकाताने आयपीएलचा किताब जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंचे आनंदाश्रू तरळले आणि ट्रॉफी आपल्या कुटुंबियांना समर्पित केली. खेळाडूंनी सोशल मीडियावर भाविनक पोस्ट लिहून कुटुंबियांचं मन जिंकलं.

श्रेयस अय्यरने शेअर केली भावनिक पोस्ट

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा किताब जिंकल्यानंतर त्याच्या आफिशियल एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत श्रेयस अय्यर त्याची बहिण आणि आईसोबत चेपॉक मैदानात आनंद साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान श्रेयस केकेआरच्या जर्सीत असून त्याच्या कुटुंबियांनी चॅम्पियन २०२४ ची टीशर्ट घातली आहे. ही पोस्ट शेअर करत अय्यरने म्हटलंय, सर्वकाही माझ्या कुटुंबियांसाठी. तुमच्यासाठीही ट्रॉफी घरी आणत आहे, पापा...

श्रेयस अय्यरने केकेआरला आयपीएलचं जेतेपद जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात श्रेयसने १५ सामन्यांमध्ये २ अर्धशतकांच्या जोरावर ३५१ धावा केल्या आहेत. फायनलच्या आधी श्रेयसने क्वालिफायर १ मध्ये हैदराबादविरोधात वादळी अर्धशतक ठोकलं होतं.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी