विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत (Shooting Competition) रविवारी महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये भारताच्या अंजुम (anjum) मुदगिलने कांस्यपदकाची मिळवले. शनिवारी झालेल्या पात्रता फेरीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अंजुमने सहाव्या स्थानी राहत अंतिम फेरी गाठली होती. अंजुमचे विश्वचषक स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. एक कांस्य आणि एक रौप्यपदक मिळवत भारताने एकूण ११ पदकांसह आपले अग्रस्थान कायम राखले आहे. भारताच्या खात्यावर चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्यपदके आहेत.
अंजुमने अंतिम फेरीत ४०२.९ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. जर्मनीच्या अॅना जॅन्सेनने (४०७.७ गुण) सुवर्ण आणि इटलीच्या बार्बरा गॅमबारोने (४०३.४ गुण) रौप्यपदक आपल्या नावे केले. शनिवारी झालेल्या पात्रता फेरीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अंजुमने सहाव्या स्थानी राहत अंतिम फेरी गाठली होती. अंजुमचे विश्वचषक स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. गेल्या महिन्यात बाकू येथे झालेल्या विश्वचषकात तिने याच प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स सांघिक गटात संजीव राजपूत, चैन सिंह आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर या भारतीय त्रिकुटाने रौप्यदपक जिंकले. पीटर निमबुरस्की, फिलिप नेपेयचाल आणि जिरी प्रिव्रात्स्की यांचा समावेश असलेल्या चेक प्रजासत्ताकच्या संघाने चुरशीच्या लढतीत १६-१२ अशी सरशी साधत सुवर्णपदक कमावले. भारताच्या त्रिकुटाने पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवत सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्रता मिळवली.