Aaditya Thackeray  Lokshahi
क्रीडा

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ, म्हणाले; "मुंबई लुटण्याचा भाजपचा..."

"महाराष्ट्रात भाजपची लूट चालणार नाही, असा निकाल जनतेनं लोकसभेत दिला आहे. तसाच निकाल तीन महिन्यानंतर देणार आहेत"

Published by : Naresh Shende

Aaditya Thackeray On BJP : मुंबईतील बोगद्यांच्या टेंडरच्या प्रश्नांवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना एका टनेलचं टेंडर झालं होतं. खोके सरकार आल्यानंतर या टनेलचं टेंडर रद्द केलं गेलं. दोन्ही टनेल अशा कंपन्यांना दिले आहेत, ज्यांचं इलेक्टोरल बॉण्डमध्ये खूप मोठं नाव गाजलेलं आहे. हा घोटाळा आहे. हे इलेक्टोरल बॉण्डसाठी होत आहे. मुंबई लुटण्याचा भाजपचा कार्यक्रम सऱ्हासपणे सुरु आहे. तीन महिन्यांतर आमचं सरकार आल्यावर आम्ही त्याची चौकशी करू. त्याआधी आम्ही आंदोलनं करणारच आहोत. महाराष्ट्रात भाजपची लूट चालणार नाही, असा निकाल जनतेनं लोकसभेत दिला आहे. तसाच निकाल तीन महिन्यानंतर देणार आहेत, अशी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, बेस्टच्या प्रश्नांबाबत आम्ही मागणी केली आहे की, मुंबई महानगर पालिकेनं बेस्टला आर्थिक सहाय्य देण्याची गरज आहे. मंबई महानगरपालिका एमएमआरडीएला पैसे देत आहेत, हे मी पहिल्यांदा ऐकत आहे. रेसकोर्सवर जे घोडे मालक आहेत, त्यांचे तबेले बनवण्यासाठी १०० कोटी खर्च करणार. पण आमच्या बेस्टला बसेल घेण्यासाठी आर्थिक सहकार्य करत नाहीत. बेस्टला पगार, पेन्शन, ग्रच्युएटी भरण्यासाठी पैसे देत नाहीत. क्रिकेटर्ससाठी गुड्स कॅरिअरची गुजरातमधून मागवण्यात आली होती.

२००७ ला अशीच परेड निघाली होती, तेव्हा मुंबई महानगरपालिकेची बेस्टची बस होती. कालपण बेस्टची बस वापरू शकले असते. भाजपच्या मनात एव्हढं गुजरात प्रेम का आहे, हे आपण पाहतोय. गुतरात प्रेम भयंकर करा, पण ते करत असताना महाराष्ट्राच द्वेष करू नका. कप सेरेमनीमध्ये क्रिकेटर्सचे फोटो लागले पाहिजेत. पण आज राजकीय फोटो लावले जात आहेत. हा आपल्या क्रिकेटर्सचा अपमान आहे. हा आपल्या देशाच्या संघाचा अपमान आहे. या खोकेवाले गद्दारांचे फोटो लावण्यापेक्षा क्रिकेटर्सचे फोटो लावणे गरजेचं आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय