भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. शिखर धवनने आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. शिखर धवनने स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.
शिखर धवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी ही निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.