Shafali Verma  
क्रीडा

वाह शेफाली वाह! महिला टेस्ट क्रिकेटमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड; 'हा' कारनामा करणारी ठरली पहिली फलंदाज

Published by : Naresh Shende

Shafali Verma Double Hundred World Record : दक्षिण आफ्रिकेविरोधात वनडे सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर आता भारतीय महिला संघाने कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी इतिहास रचला. आफ्रिकेविरोधात नाणेफेक जिंकून सलामीला उतरलेल्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने अप्रतिम फलंदाजी केली. आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत शेफाली वर्माने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. महिला कसोटी सामन्यात सर्वात वेगवान द्विशतक ठोकणारी एकमेव फलंदाजी बनली आहे. शेफालीनं १९४ चेंडूत (२०५) द्विशतक पूर्ण केलं.

याशिवाय भारताकडून पहिल्या इनिंगमध्ये स्मृीत मंधानानेही जबरदस्त फलंदाजी केली. मंधानाने १४९ धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये २९२ धावांची भागिदारी झाली. शेफाली आणि मंधानाने केलेली २९२ धावांची भागिदारी महिला कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी भागिदारी आहे.

Shafali Verma And Smriti Mandhana

महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी ओपनिंग भागिदारी करणारे फलंदाज

स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा - २९२ धावा

किरन बलूच आणि साजिदा शाह

कॅरोलिन एटकिन्स आणि ऐरन ब्रिंडल - २०० धावा

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने