Virat Kohli 
क्रीडा

विराट कोहलीच्या जीवाला धोका? एलिमिनेटर सामन्याआधी RCB ने पत्रकार परिषद आणि प्रॅक्टिस सेशन केलं रद्द

इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज एलिमिनेटर सामना खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना रंगणार आहे.

Published by : Naresh Shende

इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज एलिमिनेटर सामना खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या सुरक्षेबाबत धोका असल्याचं समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आरसीबीने प्रॅक्टिस सेशनसोबत पत्रकार परिषदही रद्द करण्याचा निर्णय घेतला.

विराट कोहलीच्या जीवाला धोका?

बंगाली दैनिक आनंद बाजार पत्रिकाच्या रिपोर्टने गुजरात पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानुसार याबाबत संकेत देण्यात आले आहेत. विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका होता, यामुळेच आरसीबीने पत्रकार परिषद आणि सराव सेशन बंद केलं होतं. गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री क्वालिफायर १ सामन्याआधी अहमदाबाद विमानतळावर आयसीसच्या ४ मोठ्या दहशतवाद्यांना अटक केली होती. हे चार दहशतवादी चेन्नईतून अहमदाबादला पोहचले होते. त्यानंतर त्यांना टार्गेट लोकेशनवर जायचं होतं. जे नरेंद्र मोदी स्टेडियमवर असण्याची शक्यता होती.

पण गुजतार एटीएसने या चौघांच्या मुसक्या आवळून जबरदस्त कामगिरी केली. श्रीलंकेहून हे चार दहशतवादी आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतल्यानंतर शस्त्र, संशयास्पद व्हिडीओ आणि मेसेजचा डेटा जप्त केला. गुजरात पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्सला याबाबत माहिती दिली. आरसीबीने सराव सेशन रद्द केल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीय.

गुजरात पोलीस अधिकारी विजय सिंघा ज्वाला यांनी माहिती दिलीय की, अहमदाबादला पोहचल्यानंतर विराट कोहलीला दशहतवाद्यांना अटक केल्याबाबत कळलं. कोहली देशाचा अनमोल रत्न आहे आणि त्याची सुरक्षा आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आरसीबी याबाबत कोणताही धोका पत्करू शकत नाही. कोणताही सराव सेशन होणार नाही, याबाबत आम्हाला त्यांनी सूचना दिली. राजस्थानचा संघ सराव सेशनमध्ये सहभागी झाला. परंतु, संघाचा कर्णधार संजू सॅमसन, रविचंद्रन अश्विन, रियान पराग आणि युजवेंद्र चहलने हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय