भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या डे-नाइट कसोटी सामन्याचा आज दुसरा संपला आहे.दिवसअखेर श्रीलंकेच्या एक बाद 28 धावा पुर्ण झाल्या आहेत. भारताने दुसरा डाव 303 धावांवर घोषित केला.त्यामुळे श्रीलंकेसमोर 447 धावांचं लक्ष्य आहे.
भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या डे-नाइट कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवलं. भारताने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर पहिल्या डावात 252 धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 92 धावा केल्या. श्रीलंकेच्या संघाला पहिल्या डावात 109 धावात रोखल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. 9 बाद 303 धावांवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने भारताचा डाव घोषित केला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या डावात श्रीलंकेसमोर 447 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर 447 धावा जमवणं श्रीलंकेच्या फलंदाजांसाठी अवघड असेल.