Rishabh Pant 
क्रीडा

T20 World Cup 2024: रिषभ पंतची प्लेईंग ११ मध्ये जागा पक्की; 'या' २ बड्या खेळाडूंचा होणार पत्ता कट

Published by : Naresh Shende

T20 World Cup Team India Squad : आगामी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारतीय खेळाडूंनी बुधवारी मैदानात सराव केला, याचा व्हिडीओही समोर आला आहे. काहींना वगळता इतर सर्व खेळाडू वर्ल्डकपसाठी अमेरिकेत पोहोचले आहेत. यावेळी निवडकर्त्यांनी ज्या १५ खेळाडूंना निवडलं आहे, त्यामध्ये रिषभ पंतच्या नावाचाही समावेश आहे. रिषभला जर प्लेईंग ११ मध्ये जागा मिळाली, तर दोन मोठे खेळाडू संजू सॅमसन आणि शिवम दुबेला बाहेर बसावं लागू शकतं.

अपघातामुळे रिषभ पंत काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात उतरला नव्हता. परंतु, आयपीएल २०२४ मध्ये पंतने मैदानात पुनरागमन केलं. त्याने दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्वच केलं नाही, तर दिल्ली कॅपिटल्ससाठी आक्रमक फलंदाजीही केली. रिषभची धडाकेबाज फलंदाजी पाहून आयपीएलमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. रिषभने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे टी-२० वर्ल्डकप च्या स्क्वॉडमध्ये त्याची निवड करण्यात आली.

पंतशिवाय टीम इंडियात विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे. जर रिषभ पंतचा प्लेईंग ११ मध्ये समावेश केला, तर संजू सॅमसन बाहेर होऊ शकतो. टीम मॅनेजमेंटने संजू सॅमसन किंवा रिषभ पंत अशा एका खेळाडूलाचा संधी देऊ शकते. जर पंतने उल्लेखनीय कामगिरी केली, तर संजूला बाहेर बसावं लागू शकतं. संजू सॅमसनशिवाय शिवम दुबेही संघातून बाहेर होऊ शकतो. कारण टीम इंडियाकडे डावखुरा फलंदाज म्हणून रिषभ पंतचा विकल्प असेल.

रिषभ पंत खेळल्यास भारतीय संघाची प्लेईंग XI

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा