क्रीडा

सानिया मिर्झा टेनिसमधून निवृत्त होणार

सानिया मिर्झा टेनिसमधून निवृत्त होणार आहे. एका वेबसाइटशी बोलताना तिने याची माहिती दिली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सानिया मिर्झा टेनिसमधून निवृत्त होणार आहे. एका वेबसाइटशी बोलताना तिने याची माहिती दिली आहे. बोलताना भारतीय टेनिस स्टारने यासंबंधीची घोषणा केली. फेब्रुवारी महिन्यात दुबईत होणारा WTA1000 इव्हेंट ही तिच्या करिअरमधली शेवटची स्पर्धा असेल.सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिस करिअरमधून सन्यास घेण्याची घोषणा केली आहे. सानियाला झालेल्या इंज्युरीमुळे हा निर्णय घेतल्याचं तिने म्हटलंय.

सानिया मिर्झाने पाच महिने डेटिंगनंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत 2010 मध्ये लग्न केलं होतं. 30 ऑक्टोबर 2018 रोजी या जोडीला इजहान मिर्झा मलिक हा मुलगा झाला. आता पाकिस्तानी मीडियातून सानिया आणि शोएबच्या तलाकच्या बातम्या समोर येत होत्या. यातून अनेक चर्चा रंगल्या.

मी प्रामाणिकपणे सांगते. माझ्या अटी-शर्थींवर जगायला मला आवडतं. मला झालेल्या जखमेमुळे टेनिसच्या बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे मी प्रशिक्षण घेत होते. असे सानियाने सांगितले. तसंच पुढील महिन्यात दुबाईतला तिचा सामना करिअरमधला अखेरचा सामना असेल. दुबई टेनिस चँपियनशिपमध्ये तिचा खेळ चाहत्यांना पाहता येईल.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण