नवी दिल्ली : कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची निवड झाली आहे. यावरून पुन्हा मोठा वाद निर्माण झाला आहे. याविरोधात साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. महासंघाविरुद्धच्या लढाईला बरीच वर्षे लागली. आज जे अध्यक्ष झाले आहेत त्यांचा उजवा हात म्हणू शकता. एकाही महिलेला सहभाग दिला नाही. मी माझी कुस्ती सोडते आहेत, असे साक्षीने म्हंटले आहे. यावेळी साक्षी भावूक झाली होती.
विनेश फोगट म्हणाली की, आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न केले आणि नंतर दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलन केले. आम्ही नावासह स्पष्टपणे सांगितले होते. आम्हाला तीन-चार महिने थांबायला सांगितले होते पण काहीही झाले नाही. संजय सिंह यांना आज अध्यक्ष करण्यात आले आहे. त्याला अध्यक्ष केले म्हणजे खेळातील मुलींना पुन्हा बळी पडावे लागेल.
आम्ही जी लढाई लढत होतो त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. देशात आम्हाला न्याय कसा मिळेल हे माहित नाही. आज कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे हे अतिशय दुःखद आहे. आपले दु:ख कोणाकडे मांडावे हेच कळत नाही. आम्ही प्रशिक्षण घेत आहोत, तरीही आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहोत, असे तिने सांगितले आहे.
तर, बजरंग पुनिया म्हणाले की, आमचा लढा पूर्वी सरकारशी नव्हता आणि आजही नाही. त्याची शक्ती आणि त्यामागे कार्यरत यंत्रणा साऱ्या देशाने पाहिली. ही लढाई सर्वांनाच लढावी लागणार आहे. आम्ही कधी कुस्ती करू शकू असे वाटत नाही. आम्ही राजकारण करण्यासाठी नाही तर आमच्या बहिणी आणि मुलींसाठी लढण्यासाठी आलो आहोत, असे त्याने म्हंटले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
23 एप्रिल रोजी कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी ब्रिजभूषण सिंह शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात धरणे आंदोलनही केले होते. यावर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यावर पोलिसांनी 15 जुन रोजी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.