महाराष्ट्राचा तरुण उगवता खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या विजय हजारे ट्रॉफीत चांगलाच खेळ दाखवताना दिसत आहे. आज ऋतुराज गायकवाडने एकाकी झुंज देत 131 चेंडूत 108 धावांची खेळी केली. त्याने फायनल सामन्यात त्याने सेंच्यूरी मारली आहे. सलग तीन सामन्यात सेंच्यूरी मारल्याने त्याने हॅट्ट्रूीक साधली आहे. गायकवाडच्या या खेळीने महाराष्ट्र संघाने फायनल सामन्यात मोठी धावसंख्या उभारली आहे.
या सामन्यात सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनादकट नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या महाराष्ट्राच्या संघाची सुरुवात खराब झाली. महाराष्ट्राच्या डावातील पाचव्या षटकात सलामीवीर पवन शाह रन आऊट झाला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि सत्यजीत बच्छावनं संयमी खेळी दाखवत संघाचा डाव पुढं नेला. परंतु, 25व्या षटकात सत्यजीत बाद झाला. मात्र, ऋतुराज गायकवाडनं एकाकी झुंज सुरूच ठेवली. त्यानं 131 चेंडूत 108 धावांचं योगदान दिलं. महाराष्ट्राच्या संघानं सौराष्ट्रासमोर 249 धावांचं लक्ष्य ठेवलंय.
महाराष्ट्राची प्लेईंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), सत्यजीत बच्छाव, अंकित बावणे, अजीम काझी, राजवर्धन हंगरगेकर, शमशुजामा काझी, सौरभ नवले (विकेटकिपर), मनोज इंगळे, मुकेश चौधरी, पवन शहा, नौशाद शेख.
सौराष्ट्राची प्लेईंग इलेव्हन
हार्विक देसाई (विकेटकिपर), शेल्डन जॅक्सन, जय गोहिल, समर्थ व्यास, प्रेरक मंकड, अर्पित वसावडा, चिराग जानी, धर्मेंद्रसिंह जडेजा, जयदेव उनाडकट (कर्णधार), कुशांग पटेल, पार्थ भुत.