IPL 2022 आयपीएल Team Lokshahi
क्रीडा

IPL 2022 रसेलची तूफान खेळी, KKR चा धमाकेदार विजय

Published by : Jitendra Zavar

आयपीएलच्या( IPL) हंगामामध्ये काल केकेआर( KOLKATA KNIGHT RIDERS) विरुद्ध पंजाब किंग्स(PUNJAB KINGS ) यांच्यामध्ये सामना रंगला. केकेआरने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय योग्य ठरला. त्यांनी पंजाब किंग्स यांना अवघ्या 137 धावांवर गुंडाळले. यामध्ये प्रामुख्याने उमेश यादव( UMESH YADAV) याने 4 ओव्हरमध्ये फक्त 23 धावा दिले आणि 4 बळी घेतले. तसेच त्याच्या जोडीला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज असलेल्या टीम साऊदी याने 2 विकेट घेतल्या.

पंजाबच्या संघाकडून शेवट खेळायला आलेला दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कगिसो रबाडा याने शेवट 21 बॉल मध्ये 25 रण बनवून जसा तसा टीमचा स्कोर 137 पर्यंत पोहोचवला.

केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य( AJINKYA RAHANE) रहाणे हे सुरुवातीलाच बाद झाले. त्यानंतर श्रेयस अय्यर( SHREYAS IYYAR) सॅम बिलिंग्स बरोबर डाव सावरला. परंतु लगेचच श्रेयस अय्यर आणि त्याच्या पाठोपाठ नितीश राणा हे दोघे बाद झाले. त्यानंतर मैदानावर आंद्रे रसल( AANDRE RASEL) खेळायला आला. त्याने सुरुवात हळू करुन डाव सावरला.

12 व्या ओव्हरमध्ये त्याने 4, 6, 6, 0, 6, 2nb ,6 असे एकूण तीस रन्स घेतले. रसल अशा फॉर्ममध्ये होता की त्याची मिस हिट सुद्धा बाउंड्रीच्या बाहेर जात होती. चौदाव्या ओव्हरमध्ये त्याने दोन सिक्स मारून मॅचच संपवून टाकली. मॅच संपेपर्यंत रसेल 37 मिनिटे हा मैदानात वर होता. या 37 मिनिटांमध्ये त्याने 31 बॉल मध्ये 70 रन्सची तुफानी खेळी केली. या खेळांमध्ये रसेल दोन चौके आणि आठ षटकार मारले.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी