चेन्नईने राजस्थानचा 45 धावांनी पराभव केला आहे. राजस्थानला 9 विकेट गमावून 143 धावाच केल्या. जॉस बटलरने एकाकी झुंज दिली. मात्र राजस्थानला विजय मिळवता आला नाही.
आयपीएलच्या आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जने 9 विकेट गमावून 188 धावांपर्यत मजल मारली आहे. फाफ डु प्लेसिस सर्वाधिक 33 धावा केल्या. इतर खेळाडू मात्र मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे राजस्थान रॉयल्ससमोर 189 धावांचे आव्हान होते.
नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नई प्रथम फलंदाजीस उतरली होती. सलामीची सुरुवात फॅफ डुप्लेसी आणि ऋतुराज गायकवाड या जोडीने केली. मात्र दोघेही मोठी धावसंख्या करू शकले नाही. सलामीवीर फॅफ डुप्लेसी 33, ऋतुराज गायकवाड 10 धावांवर बाद झाला. मोईन अली 26, अंबाती रायुडू 27, रवींद्र जाडेजा 8 तर महेंद्रसिंह धोनी 18 धावांवर बाद झाला.