क्रीडा

RCB VS SRH: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादला 35 धावांनी घरच्या मैदानावर केलं पराभूत

Published by : Dhanshree Shintre

आयपीएल 2024 चा 41 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत सात गडी गमावून 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादला 20 षटकांत 8 गडी गमावून 171 धावा करता आल्या.

या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा विजय रथ 35 धावांनी रोखला. प्रथम फलंदाजी करताना डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाने 20 षटकांत सात गडी गमावून 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत 8 गडी गमावून 171 धावा करता आल्या. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला.

गुरुवारी हैदराबादने आरसीबीविरुद्ध आठवा सामना खेळला. या सामन्यात संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु या पराभवानंतरही हैदराबाद संघ 10 गुण आणि 0.577 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे आरसीबीने या हांगामातील हा दुसरा विजय मिळवला आहे. या विजयानंतर आरसीबी 4 गुणांसह गुणतालिकेत 10 व्या स्थानावर आहे. आरसीबी आता 4 गुणांसह गुणांच्या बाबतीत पंजाब किंग्जच्या बरोबरीत आले आहे. परंतु गुणतालिकेत नेट रनरेट कमी असल्याने ते अजूनही सर्वात खालच्या स्थानावर म्हणजेच 10 व्या स्थानावर आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग 11:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल. इम्पॅक्ट प्लेयर्स: स्वप्नील सिंग

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग 11:

अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन. इम्पॅक्ट प्लेयर्स: ट्रॅव्हिस हेड.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा