आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 15 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. या सामन्यात क्विंटन डी कॉकच्या 80 धावांच्या खेळीमुळे लखनौने 20 षटकात 5 गडी गमावून 181 धावा केल्या आणि आरसीबीसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात फाफ डुप्लेसिसचा संघ 153 धावा करून सर्वबाद झाला. लखनौचा या स्पर्धेतील तीन सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे तर आरसीबीला यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला होता.
लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयांक यादव सध्या चर्चेत आहे. प्रत्येक सामन्यात त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे तो विक्रमाची मालिका रचत आहे. मंगळवारी म्हणजेच काल झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यातही त्याने असचं काही केले. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 14 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना लखनऊने चांगली सुरुवात केली होती. लखनौने 20 षटकात 5 गडी गमावून 181 धावा केल्या. 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने सावध सुरुवात केली होती. परंतू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 182 धावा करु शकले नाही आणि सामना गमावला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेईंग 11:
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (C), कैमरून ग्रीन, ग्लेन मैक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (WK), रीस टॉपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल
लखनऊ सुपर जायंट्स प्लेईंग 11:
क्विंटन डी कॉक (WK), केएल राहुल (C), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, रवि बिश्नोई, यश ठाकुर, नवीन-उल-हक, मयंक यादव