आरसीबीने लखनौला विजयासाठी दिलेल्या 182 धावांचे आव्हान लखनौ पुर्ण करू शकला नाही. लखनौ 8 बाद 163 धावा करू शकला.त्यामुळे आरसीबीने लखनौंवर 18 धावांनी 'रॉयल' विजय मिळवला.
आरसीबीने दिलेल्या 182 धावांचे आव्हान पुर्ण करण्यासाठी उतरलेल्या लखनौची सुरूवात चांगली झाली नाही. लोकेश राहुल 30, कृणाल पांड्या 42, डि कॉक 3 तर पांडे 6 धावा करुन बाद झाला आहे.
लखनौ संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बंगळुरूच्या संघाची खराब सुरूवात झालीय. बंगळुरूच्या संघानं पावर प्लेच्या आत तीन विकेट्स गमावले आहेत. अनुज रावत 4 धावा करुन तर कोहली शून्य धावांवर बाद झाला आहे. शाहबाज अहमद धावचीत होऊन तंबूत परतला आहे.आरसीबीचा कर्णधार फाफने दमदार अशा 64 चेंडूत 96 धावा केल्या असून अवघ्या चार धावांनी त्याचं शतक हुकलं आहे. या बळावर आरसीबीने 182 धावा उभारल्या होत्या.