आयपीएल 2024 चा 29 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर खेळला गेला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 207 धावांचे लक्ष ठेवले. प्रत्युत्तरात मुंबईला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 186 धावा करता आल्या आणि मुंबई इंडियन्सने सामना 20 धावांनी गमावला.
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केल्यानंतर त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सची गुणतालिकेत आठ गुणांसह बरोबरी केली आहे. 0.726च्या निव्वळ रनरेटसह गुणतालिकेत संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी मुंबईचा संघ 4 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. आयपीएलच्या 29 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 186 धावा केल्या.
मुंबईच्या या मोसमातला हा चौथा पराभव आहे. ऋतुराज गायकवााडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2024 च्या हंगामात आपली चांगली कामगिरी सुरु ठेवली. रविवारी 14 एप्रिलला झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर 20 धावांनी पराभव केला.