क्रीडा

Team India Announced ;दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद

Published by : Lokshahi News

मुंबई | भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या शिरकावामुळे दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना वेळापत्रकात थोडा बदल करुन दौरा 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. दरम्यान दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून यावेळी रोहित शर्माचं प्रमोशन झाल्याचं पाहायला मिळत आहे. रोहितला टी20 नंतर आता एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही मिळालं आहे. तर कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणूनही रोहित काम पाहणार आहे.

द. आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

कसोटी सामन्यांचे वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना – 26 डिसेंबर, 2021 ते 30 डिसेंबर, 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन.
  • दुसरा कसोटी सामना – 3 जानेवारी,2022 ते 7 जानेवीर, 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.
  • तिसरा कसोटी सामना – 11 जानेवारी, 2022 ते 15 जानेवारी, 2022 न्यू लँड्स, केपटाऊन

एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना – 19 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल
  • दुसरा एकदिवसीय सामना – 21 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल
  • तिसरा एकदिवसीय सामना – 23 जानेवारी, 2022, न्यू लँड्स, केपटाऊन

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी