आयपीएल 2025 च्या लिलावात आज खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. एकूण 577 खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात 82 खेळाडूंनी अव्वल स्तरावर नोंदणी केली जाणार आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे. तर 27 खेळाडूंची दुसरी किंमत 1.50 कोटी आहे. त्याचसोबत 18 खेळाडूंची किंमत 1.25 कोटी आहे आणि 23 खेळाडूंची किंमत 1 कोटी अशा राखीव किंमतीसह यादी करण्यात आली असून उरलेल्या खेळाडूंना 30 लाख ते 75 लाखापर्यंत वर्गीकृत केले आहे. यादरम्यान सर्वात महागडा खेळाडू किती पैसे घरी घेऊन जाणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष होते.
आयपीएल 2025च्या लिलावात श्रेयस अय्यरने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. त्याला पंजाब किंग्सने 26.75 कोटीला संघात सामिल करून घेतले. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल विजेत्या कर्णधारासाठी शेवटपर्यंत टिकून होते परंतू त्यांच्याकडे तेवढी रक्कम शिल्लक नसल्यामुळे माघार घ्यावी लागली.
यानंतर पहिल्या सत्रामधील शेवटचा खेळाडू ऋषभ पंतसाठी लखनौ सुपर जायंट्सने बोली लावण्यास सुरुवात केली. त्याच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू देखील लढत लावण्यास सज्ज झाली. लखनौने ऋषभसाठी २७ कोटी ही किंमत ठेवली आणि DC ने माघार घेतली. त्यामुळे लखनौने २७ कोटींत ऋषभला आपल्या संघात घेतले आणि आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.