आयपीएल २०२४ ची 'रन'धुमाळी सुरु होण्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. डुप्लेसिस माध्यमांशी बोलताना म्हणाला, आरसीबी विरुद्ध सीएसके पहिला सामना रंगणार आहे. जर पहिलाच सामना आरसीबी आणि चेन्नईचा असेल, तर आयपीएलची यापेक्षा चांगली सुरुवात होऊच शकत नाही. भारताचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि एम एस धोनी आमनेसामने येणार आहेत. म्हणून हा सामना खूप धमाकेदार होणार आहे.
आयपीएलच्या १७ व्या हंगामाचा पहिला सामना पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि विराट कोहलीच्या आरसीबी यांच्यात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून आयपीएलची धमाकेदार सुरुवात करण्याचा दोन्ही कर्णधारांचा प्रयत्न असणार आहे. अशातच खूप रंगतदार सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि एम एस धोनी हे दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला आहे.
फाफ डुप्लेसिस म्हणाला, वास्तविक हा आठवडा खूप चांगला राहिला आहे. एंडी फ्लॉवरने जबरदस्त काम केलं आहे. एक टीम म्हणून आम्ही एकत्र आहोत. आमची तयारी खूप चांगली झाली आहे. जर भारताचे दोन महान खेळाडू विराट कोहली आणि एम एस धोनी आमनेसामने येणार आहेत, तर आयपीएलची सुरुवात नक्कीच चांगली होईल. सर्वांनाच या सामन्याची खूप उत्सुकता आहे. आरसीबीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकलं नाहीय. संघ १६ वर्षांपासून विजेतेपद जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. पंरतु, आतापर्यंत आरसीबीला यश संपादन करता आलं नाही. यंदाच्या हंगामात जेतेपद पटकावण्यासाठी आरसीबी नक्कीच प्रयत्न करेल.