आयपीएल 2024चा 68वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 27 धावांनी विजय मिळवत प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. करा किंवा मरोच्या सामन्यात आरसीबीने चेन्नईविरुद्ध 20 षटकांत पाच गडी गमावून 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकांत 7 गडी गमावून 191 धावाच करता आल्या.
यासह फाफ डुप्लेसिसचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा या मोसमातील चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद पात्र ठरले होते. त्याचवेळी या पराभवाने सीएसकेचा प्रवास संपुष्टात आला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकांत 7 गडी गमावून 191 धावाच करता आल्या.
14 सामन्यांमध्ये सात विजयांसह, RCB पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. संघाच्या खात्यात आता 14 गुण आहेत आणि त्यांचा निव्वळ धावगती +0.459 आहे. त्याचबरोबर कोलकाता 19 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राजस्थान आणि हैदराबादचे संघ आहेत, ज्यांच्या खात्यात अनुक्रमे 16 आणि 15 गुण आहेत. रविवारी राजस्थान आणि हैदराबादचे संघ साखळी टप्प्यातील शेवटचे सामने खेळतील. आता या दोघांमध्ये अव्वल स्थानासाठी लढत होणार आहे.