आयपीएल 2024 च्या 25 व्या सामन्यत मुंबई इंडियन्सने आरसीबीविरुद्ध 7 गडी राखून विजय मिळवला. तसेच आता दुसऱ्या विजयासह मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे आणि आरसीबी आता नवव्या स्थानावर आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बंगळुरूने 20 षटकांत 8 गडी गमावून 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 15.3 षटकांत 3 गडी गमावून 199 धावा केल्या.
197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी झाली. इशान किशनने या सामन्यात 202.94 च्या स्ट्राईक रेटने सात चौकार आणि पाच षटकार मारले. तो 69 धावा करून बाद झाला.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने स्फोटक कामगिरी केली. त्याने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक ठोकले. या स्टार फलंदाजाने 273.68 च्या स्ट्राईक रेटने 52 धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि चार षटकार आले. त्याला विजयकुमार विशाकने लोमराच्या हाती झेलबाद केले. यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी डावाची धुरा सांभाळत संघाला विजयाकडे नेले.