आयपीएल 2024 चा 27 वा सामना शनिवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. राजस्थानने पंजाबचा 3 गडी राखून पराभव करत विजयी मार्ग दाखवला. मोसमातील पाचव्या विजयासह संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्ज चार गुणांसह आठव्या स्थानावर पोहोचला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पंजाबने आशुतोष शर्माच्या 31 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत आठ गडी गमावून 147 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने एक चेंडू शिल्लक असताना 7 गडी गमावून 152 धावा केल्या आणि सामना 3 गडी राखून जिंकला.
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने राजस्थानसमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने पंजाबचा 3 गडी राखून पराभव करत मोसमातील तिसरा विजय संपादन केला. 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने सावध सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि तनुष कोटियन यांनी 56 धावांची सलामी दिली. मात्र कोटियन 24 धावांवर बाद झाला. दुसऱ्या बाजूने यशस्वी जैस्वालने फटकेबाजी करत 28 चेंडूत 4 चौकारांसह 39 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन (18) धृव जुरेल (6), रॉवमन पॉवेल (11) आणि रियान पराग (23) बाद झाले. तर शिम्रोन हेमायरने 10 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाग 27 धावा केल्या आणि विजय मिळवून दिला.
पंजाब किंग्ज प्लेइंग 11:
जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग 11:
संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.