क्रीडा

RR VS RCB: राजस्थानने आरसीबीचा 6 गडी राखून केला पराभव; बेंगळुरूचा तिसरा पराभव

Published by : Dhanshree Shintre

आयपीएल 2024 च्या 19 व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झाला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात दोन शतके पाहायला मिळाली. आरसीबीसाठी प्रथम कोहलीने नाबाद शतक झळकावले आणि त्यानंतर जोस बटलरही राजस्थानसाठी शतक झळकावण्यात यशस्वी ठरला. जोस बटरलच्या नाबाद खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल सामन्यात रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु संघावर सहा गडी राखून विजय मिळवला.

राजस्थानचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे, तर आरसीबीने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. बंगळुरुने दिलेल्या 184 धावांचा पाठलाग करताना राजस्ठानने 4 बाद 189 धावा केल्या. विराट कोहलीच्या नाबाद 113 धावांच्या जोरावर आरसीबीने 20 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 183 धावा केल्या होत्या, मात्र बटलरचे शतक आणि कर्णधार संजू सॅमसनच्या 69 धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने पाच चेंडू शिल्लक असताना चार गड्यांच्या मोबदल्यात 189 धावा करत विजयाची नोंद केली.

आरसीबीवरील या विजयासह, राजस्थान संघ चार सामन्यांत चार विजय आणि आठ विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे, तर कोलकाता नाइट रायडर्स संघ सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर सॅमसनने आपली विकेट गमावली, पण बटलरने शेवटपर्यंत टिकून राहून षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले आणि संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला. यासह आपल्या संघासाठी धाडसी खेळी करणाऱ्या कोहलीचे शतक व्यर्थ गेले.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने