आयपीएल 2024 च्या 19 व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झाला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात दोन शतके पाहायला मिळाली. आरसीबीसाठी प्रथम कोहलीने नाबाद शतक झळकावले आणि त्यानंतर जोस बटलरही राजस्थानसाठी शतक झळकावण्यात यशस्वी ठरला. कोहलीच्या नाबाद 113 धावांच्या बळावर आरसीबीने 20 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 183 धावा केल्या होत्या, मात्र जोस बटलरच्या नाबाद 100 धावा आणि कर्णधार संजू सॅमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने पाच चेंडू शिल्लक असताना चार गड्यांच्या मोबदल्यात 189 धावा केल्या.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली सलामीला उतरले. या दोघांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर हमला केला. या दोघांनी 125 धावांची सलामी दिली. विराट कोहलीने आज नाबाद 113 धावांची खेळी केली. त्याचे हे IPL करिअरमधील 8 वे शतक आहे. विराट IPL मध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू आहे. विराटनंतर क्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेलच्या नावावर 6 शतके आहेत. या सामन्यात विराट कोहलीने IPL मध्ये 7500 धावांचा टप्पाही ओलांडला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग 11:
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सौरव चौहान, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग 11:
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.