West Indies Team Lokshahi
क्रीडा

वेस्ट इंडीजच्या संघासाठी मोठा झटका, मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांचा राजीनामा

वेस्ट इंडीजचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या 30 नोव्हेंबरपासून 12 डिसेंबर कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेत फिल सिमन्स वेस्ट इंडीजच्या संघाला अखेरचे मार्गदर्शन करतील.

Published by : Sagar Pradhan

ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतूनच वेस्ट इंडीजच्या संघाला सामान गुंडाळावे लागले. सर्वाधिक वेळा टी-20 विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या संघासोबत यंदा खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्सने आपल्या पदाचा राजीनामा दिला. क्रिकेट वेस्ट इंडीजनं याबाबत माहिती दिली आहे.

वेस्ट इंडीजचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या 30 नोव्हेंबरपासून 12 डिसेंबर कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेत फिल सिमन्स वेस्ट इंडीजच्या संघाला अखेरचे मार्गदर्शन करतील.

टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडीजच्या संघाची खराब कामगिरी

ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडीजच्या संघाने अतिशय खराब प्रदर्शन केले. निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजच्या संघाला सुपर-12 मध्ये स्थान मिळवता आले नाही.

फिल सिमन्सची कारकिर्द

फिल सिमन्सनं 26 कसोटी, 143 एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सिमन्सच्या नावावर 3 हजार 675 धावा आणि 83 विकेट्सची नोंद आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीतील शेवटचा एकदिवसीय सामना 1999 मध्ये खेळला होता. सिमन्सच्या कार्यकाळात वेस्ट इंडीजच्या संघानं 2016 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता. यापूर्वी फिल सिमन्सनं आठ वर्ष आयर्लंडच्या संघाला प्रशिक्षण दिले होते.

शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल