लखनौने पंजाबचा 20 धावांनी पराभव केला. लखनौने दिलेले 154 धावांचे आव्हान पंजाब पुर्ण करू शकला नाही, त्यामुळे पंजाबचा पराभव झाला आहे.पंजाबचा संघ 133 धावांपर्यंत मजल मारु शकला.
पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या भेदक माऱ्यापुढे लखनौने निर्धारित 20 षटकात आठ बाद 153 धावा केल्या. लखनौकडून क्विंटन डिकॉक याने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. तर पंजाबकडून कगिसो रबाडाने चार गड्यांना तंबूत पाठवले. पंजाबला विजयासाठी 20 षटकांत 154 धावांचे आव्हान दिले आहे.