Rohit Sharma vs Babar Azam 
क्रीडा

IND Vs PAK, T20 World Cup : "...भीतीचं वातावरण"; भारताविरोधात होणाऱ्या सामन्याआधी बाबर आझमचं मोठं विधान

Published by : Naresh Shende

IND Vs PAK, T20 World Cup Update : भारता आणि पाकिस्तानच्या सामना असल्यावर खूप मोठा दबाव असतो. कारण जगभरातील क्रिकेटप्रेमींसह दोन्ही देशातील माजी खेळाडूंच्या या सामन्याकडे नजरा खिळलेल्या असतात. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा महामुकाबला रंगणार आहे. हा सामना ९ जूनला न्यूयॉर्कमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठी प्रतिक्रिया दीली आहे.

काय म्हणाला बाबर आझम?

"भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याची नेहमीच चर्चा होत असते. तुम्ही जगात कुठेही गेला, या सामन्याचीच चर्चा जास्त असते. खेळाडूंना वेगवेगळे वाईब्स आणि उत्साह मिळत असतो. प्रत्येकजण आपल्या देशाचं समर्थन करत असतो. त्यामुळे या सामन्याकडे विशेष लक्ष असतं. ज्या दिवशी भारत आणि पाकिस्तानचा सामना असतो, त्या दिवसावर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतं."

निश्चितच या सामन्यात भीतीचं वातावरण असेल. पण आम्हाला बेसिक्सवर टीकून राहावं लागेल आणि सोपं क्रिकेट खेळण्यावर लक्ष द्यावं लागेल. हा नेहमीच दबावाचा खेळ असतो. तुम्ही जेव्हढं शांत राहाल, तुमच्या कौशल्यावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवला, तर गोष्टी सोप्या होत जातात."

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानविरोधात जबरदस्त विक्रम आहे. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या ७ पैकी ६ सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. २०२१ मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारताचा एकदाच पराभव झाला होता.

Bollywood stars Ganesha 2024 : बॉलीवूड कलाकारांच्या घरी बाप्पा! पाहा फोटो

Local Mega Block : गणेशोत्सवानिमित्त रेल्वे प्रवाशांना दिसाला

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News