भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीला सुरूवात होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत उलटफेर पाहायला मिळाले. भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याला फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा धक्का बसला अन् त्याला कारणीभूत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ठरला आहे. जसप्रीत बुमराह हाही टॉप टेनमधून बाहेर फेकला गेला आहे.
पाकिस्ताननं दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. बाबरनं या कसोटीत ७५ व ३३ धावांची खेळी केली. त्यामुळे त्यानं आयसीसी कसोटी फलंदाजांमध्ये ७४९ गुणांसह एक स्थानाच्या सुधारणेसह ७व्या क्रमांकावर झेप घेतली. पाकिस्तानचा शतकवीर फवाद आलम ३४ स्थानांच्या सुधारणेसह २१व्या क्रमांकावर आला आहे. मोहम्मद रिझवानही टॉप २०मध्ये आला आहे. बाबारनं रिषभ पंतला ८व्या स्थानावर ढकलले.