ऑलिम्पिक 2024

Neeraj Chopra: ॲथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकणारा नीरज ठरला पहिला भारतीय खेळाडू

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 89.45 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्य पदक जिंकले.

Published by : Dhanshree Shintre

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 89.45 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्य पदक जिंकले. नीरजची या मोसमातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यासह नीरज हा स्वातंत्र्यानंतर ॲथलेटिक्समध्ये दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकले होते, परंतु पॅरिसमध्ये तो टोकियोच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. पाकिस्तानच्या नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटरची विक्रमी फेक करून सुवर्णपदक जिंकले. 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकनंतर पाकिस्तानचे हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 88.54 मीटर फेकसह तिसरे स्थान पटकावले.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पहिल्याच प्रयत्नात फाऊलने सुरुवात केली. नीरजला सुरुवातीपासूनच नदीमकडून कडव्या आव्हनाची अपेक्षा होती. त्याचवेळी ज्यूनिअर वेबरनेही पहिल्याच प्रयत्नात फाऊल केले. गतविजेता नीरज चोप्रानेही पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत फाऊलने सुरुवात केली. भाला फेकल्यानंतर नीरजला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याने रेषेला स्पर्श केल्यामुळे त्याचा प्रयत्न फाऊल घोषित करण्यात आला. पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात नीरजने 89.34 मीटर फेक करुन अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्याची माहिती आहे.

89.45 मीटर फेक करून अर्शद नदीमनंतर दुसरा क्रमांक पटकावला. नीरजच्या कारकिर्दीतील हा दुसरा आणि या मोसमातील सर्वोत्तम थ्रो ठरला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने तिसऱ्या प्रयत्नात ८८.७२ मीटर फेक केली आणि पहिल्या तीन प्रयत्नांनंतरही तो अव्वल राहिला. तिसऱ्या प्रयत्नातही नीरज चोप्राने फाऊल केले. यानंतर नीरजने पुढचे तीन प्रयत्न फाऊल केले. अंतिम फेरीत नीरजला एकच यशस्वी प्रयत्न करता आला. याआधी नीरजने नेहमीच 10 सामन्यांमध्ये नदीमचा पराभव केला होता, मात्र पॅरिस गेम्सच्या अंतिम फेरीत नदीम सुरुवातीपासूनच नीरजपेक्षा पुढे होता.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट