टी-20 विश्वचषकातील पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंड संघाने इंग्लंडला मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली. त्यानंतर पाकिस्तानला मात देत ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता चषकावर नाव कोरण्यासाठी हे दोघे एकमेंकाविरुद्ध भिडत आहेत.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कर्णधार केनच्या 85 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. संघाच्या २८ धावा असताना डेरिल मिचेल बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन मैदानात उतरला.त्यामुळे गडी राखत मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान त्याच्यासमोर होतं. त्याने सुरुवातीला संथगतीने खेळत नंतर आक्रमक फटकेबाजी केली. त्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली.