टी – 20 विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना आज रविवारी (31 ऑक्टोबर) न्यूझीलंड विरुद्ध खेळवला जाणार आहे. सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी या सामन्याला सूरूवात होणार असून नाणेफेक 7 वाजता होणार आहे.
पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध तब्बल 10 विकेट्सनी गमावल्यानंतर आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजचा सामना भारतासाठी फार महत्त्वाचा आहे. भारतासह न्यूझीलंडसाठीही सामना अतिशय महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघानी पहिला सामना गमावला आहे. दरम्यान नेट रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंडची परिस्थिती भारतापेक्षा बरी आहे, त्यामुळे भारताला हा सामना गमावून चालणार नाही, अन्यथा भारताचा सेमीफायनलचा मार्ग आणखी खडतर होईल.