नीरज चोप्रानं लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यानं 87.66 मीटर अंतरावर भालाफेक केला. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नीरज चोप्रानं या लीगच्या पाचव्या फेरीत 87.66 मीटर फेक करून हे विजेतेपद पटकावलं.
या फेरीत फाऊलनं सुरुवात केली आणि नंतर 83.52 मीटर, त्यानंतर 85.04 मीटर भाला फेक केली. पुढच्याच फेरीत नीरजनं 87.66 मीटरवर भाला फेकला. नीरजचा शेवटचा थ्रो 84.15 मीटर होता, पण पाचव्या फेरीत नीरज जबरदस्त कामगिरी करत डायमंड लीगचा खिताब पटकावला.