Team India | navdeep saini team lokshahi
क्रीडा

'या' खेळाडूने दुसऱ्या देशाच्या संघासोबत खेळण्याचा घेतला निर्णय

बराच काळ होता संघाबाहेर

Published by : Shubham Tate

Team India : इंग्लड काउंटी संघ केंटने शुक्रवारी जाहीर केले की त्यांनी काउंटी चॅम्पियनशिपमधील तीन सामन्यांसाठी आणि रॉयल लंडन कपमधील पाच सामन्यांसाठी भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला करारबद्ध केले आहे. 29 वर्षीय खेळाडूने 2 कसोटी, 8 एकदिवसीय आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 2, 6 आणि 13 विकेट्ससह भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. (navdeep saini will play for kent in county championship england team)

बराच वेळ बाहेर

गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात तो भारताकडून शेवटचा खेळताना दिसला होता. सैनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो आणि आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करतो. चेतेश्वर पुजारा (ससेक्स), वॉशिंग्टन सुंदर (लंकेशायर), क्रुणाल पंड्या (वॉरविकशायर) आणि उमेश यादव (मिडलसेक्स) यांच्यानंतर 2022 मध्ये इंग्लड देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी साइन अप करणारा सैनी हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

ताकद दाखवणार

केंटने असेही सांगितले की, वेगवान गोलंदाज सैनी त्याचा आवडता शर्ट क्रमांक 96 घालेल आणि राहुल द्रविडच्या पावलावर पाऊल टाकून काऊंटीकडून खेळणारा दुसरा भारतीय कसोटी क्रिकेटपटू होईल. सैनी म्हणाला, "कौंटी क्रिकेट खेळण्याची ही एक चांगली संधी आहे आणि मी केंटसाठी माझे 100 टक्के योगदान देण्यास उत्सुक आहे." केंटचे क्रिकेट संचालक पॉल डाऊन्टन म्हणाले, नवदीपला आमच्या संघात घेण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत.

सैनीने जूनमध्ये लीसेस्टरशायरविरुद्धच्या चार दिवसीय सराव सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात 3/55 घेतले, परंतु एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्याचा समावेश करण्यात आला नाही.

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत