आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पाच वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सची चौथी हार झाली आहे. तर आरसीबी विजयी झाला आहे. अनुज रावतने ६६ धावा आणि विराट कोहलीच्या 48 धावांच्या बळावर त्यांनी हा विजय मिळवला.
मुंबईने दिलेल्या १५२ धावांचे लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या बंगळुरुची सुरूवात चांगली झाली होती. कर्णधार फाफ डू प्लेलिस १६ धावांवर बाद झाला. अनुज रावतने ६६ धावा केल्या असून रमणदीप सिंगने त्याला धावबाद केले.विराट कोहली 48 धावा केल्या.
आरसीबीने टॉस जिंकत फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सची चांगली सुरुवात झाली होती. इशन किशन आणि रोहित शर्मा ही जोडी चांगली टीकली होती. मात्र 26 धावांवर रोहित झेल बाद झाला. देवाल्ड ब्रेविसच्या रुपात मुंबईला दुसरा मोठा झटका बसला आहे. देवाल्ड अवघ्या आठ धावांवर तंबूत परतला. इशान किशन २८ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या.चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना तिलक वर्मा बाद झाला.फलंदाज किरॉन पोलार्ड शून्यावर पायचित झाला. रमणदीप सिंग अवघ्या सहा धावा करुन तंबुत परतला. तर सूर्यकुमारने सर्वाधिक ६८ धावा केल्या. या बळावर मुंबईने 151 धावा पुर्ण केल्या होत्य़ा. त्यामुळे आरसीबीसमोर 152 धावांचे लक्ष्य़ होते.